आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधणार!

cm thackeray

मुंबई : राज्यात सद्या शाळा सुरु करण्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. योग्य खबरदारी घेऊन उद्यापासून (दि. २३ नोव्हेंबर) नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दिल्लीसह अन्य राज्यातील वाढती कोरोना स्थिती व शाळेमध्ये झालेले संसर्ग यासोबतच, दिवाळीनंतर राज्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे.

त्यामुळे, मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील सद्या शाळा सुरु होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागाबाबत काय निर्णय होणार? उद्या शाळा सुरु होणार का? यावरून पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारने अद्यापही निर्णय घेतला नसून सद्याची वाढती रुग्णसंख्या बघता राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता धूसर आहे.

त्यामुळेच, वाढती कोरोना रुग्णसंख्या, शाळा सुरु करणे, लोकल, वाढीव वीजबिलात दिलासा व इतर अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बोलणार का? याकडं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष्य लागलं आहे. उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेला संबोधणार आहेत. त्यामुळे ते कोणत्या विषयावर बोलणार यावरून सद्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या