मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली: सुशील कुमार मोदी

uddhav thackeray

मुंबई: सुशांत सिंह प्रकरणी गुंता वाढत असून त्याचे मित्र, गर्लफ्रेंड, बहीण, वडील, मैत्रीण अंकिता लोखंडे हे अनेक वेगवेगळ्या बाबींवर खुलासा करताना दिसत असून स्पष्ट धागेदोरे मात्र पोलिसांच्या हाती लागताना दिसत आहे आहेत. तर, या प्रकरणी अनेक बढया व्यक्तींची नावे समोर येत असल्याने मुंबई पोलिसांवर दबाव येत असून सीबीआयकडे चौकशी सोपवण्यात यावी, अशी मागणी राजकीय व्यक्तींसह अनेक चाहते करताना दिसत आहेत.

यातच, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहेत. तसेच, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यासाठी कल दिला जातो आहे, असे म्हणत काँग्रेस बिहारमधील जनतेला काय तोंड दाखवणार? असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारी नंतर रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील केलेल्या अनेक धक्कादायक खुलासे केले असून, रिया व अंकिताच्या चौकशीसाठी बिहार पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले होते. बिहार पोलिसांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी देखील करण्यात आले आहेत.

“माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे”, सुप्रिया सुळेंनी सांगितली टोपेंच्या मातोश्रींची आठवण…

सुशील कुमार मोदी यांनी, उंच झेप घेत यश मिळवणाऱ्या बिहारचा सुपुत्र सुशांतच्या अचानक जाण्याने कोट्यवधी बिहारी जनतेला दुःख झाल्याचे सांगत सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी केली आहे तर, बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीमुळे सुशांतला डावलण्यात आल्याचे आरोप लावले जात असून त्यामुळेच सुशांतने हे पाऊल उचलल्याचे आरोप देखील झाला होता, त्यामुळे अनेक मोठ्या दिग्दर्शकांची चौकशी देखील मुंबई पोलीस करत आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

IMP