मुंबई : काल (२५ एप्रिल) मुंबईमध्ये ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?’, असा सवाल ठाकरेंनी केला. तसेच बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहांत तर तुमचे हिंदुत्व आहे कुठे?, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलत असतांना भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले की,‘बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे त्यांना आम्ही काडीची किंमत देत नाही. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो आणि करत राहू यासाठी हा कार्यक्रम आहे’, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक!
- “बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीची किंमत नाही”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 PBKS vs CSK : धवनचा चेन्नईविरुद्ध ‘गब्बर’ खेळ; पंजाबनं ठोकल्या १८७ धावा!
- IPL 2022 PBKS vs CSK : धवन जोडीची कमाल..! चेन्नईचा अजून एक पराभव; पंजाबनं ११ धावांनी मारली बाजी!
- IPL 2022 PBKS vs CSK : ६ वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या ऋषी धवननं का लावली होती face shield? वाचा कारण!