विकासाच्या नावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही; खा. जलील यांची टिका!

imtiyaz jaleel

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या भाषणात म्हणाले, काही जणांना असे वाटते की, शहरातील विकासाची कामे खुप चांगली झाली म्हणुन आज त्यांनी माझ्या स्वागताचे बोर्ड लावले. अरे बाबा, याला विकास नाही म्हणत हा तुमच्यासाठी विकास असेल हा आमच्यासाठी विकास तो विकास नाही. ज्यांनी मला धन्यवाद म्हणुन बोर्ड दाखवलं त्यांना मला सांगायचय की, खरा विकास तुम्ही पाहिलेलाच नाही. तो आता बघणार आहात. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. आत्तापर्यंत शहरात विकास कामे झाले नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच विकासाच्या नावावर शिवसेना आता औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही. असेही ते म्हणाले.

खासदार इम्तियाज जलील यांनी पुष्पवृष्टी करुन स्वागत व धन्यवाद केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता आपल्या भाषणात यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या या वक्तव्यावर जलील म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी भाषण देऊन स्पष्ट केले की शिवसेना पक्ष, माजी खासदार व १४ कर्तृत्वान महापौरांनी मागच्या ३० वर्षापासुन ते आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास न करता फक्त औरंगाबादकरांची फसवणुक केलेली आहे.

त्यांच्या स्वत:च्या पक्षाने शहरात विकासाच्या गंगेचे जे मोठमोठे होर्डिंग व चौकाचौकात बॅनर लावले, वृत्तमानपत्रात जाहिराती दिल्या, भाषणे दिली, सुपर संभाजीनगर या विकासात्मक कामाच्या पुस्तकाचे विमोचन केले ते सर्व फसवे, खोटे व बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीत आजपर्यंत जो विकास झाला तो विकास आम्ही केलेलाच नाही. असे मुख्यमंत्र्यांनी स्वत: कबुल केले. मुख्यमंत्र्यांना सुध्दा आता कळुन चुकले की, आपण औरंगाबादच्या जनतेला विकासाच्या नावावर उल्लु बनवु शकत नाही म्हणुन त्यांनी घोषित केले कि, आजपासून आम्ही विकासाच्या कामांना सुरुवात करणार आहोत.

महत्त्वाच्या बातम्या