त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी महाभारतानंतर माजी मिस वर्ल्डबाबत केले वादग्रस्त विधान

टीम महाराष्ट्र देशा : त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री पदाची माळ बिप्लब देव या तरुण नेत्याच्या गळ्यात पडला मात्र बिप्लब देव हे आपल्या कामापेक्षा आपल्या वाचाळ विधानानेच जास्त चर्चेत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

डायना हेडनला 21 वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर बिप्लब देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विविध स्तरांवर आयोजित होणाऱ्या सौंदर्य स्पर्धा या बोगस असून, हेडन हिला खिताब देण्याची प्रक्रिया समजली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र ऐश्वर्या रॉय हिच्या सौंदर्याचे देव यांनी कौतुक केले आहे. ऐश्वर्या खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते, असे त्यांनी म्हटले आहे. “आम्ही भारतीय महिलांना लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात मानतो. ऐश्वर्या रॉय भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते. डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही.”

You might also like
Comments
Loading...