औरंगाबादमध्ये सकल मराठा समाज विचारणार मुख्यमंत्र्यांना जाब !

Action for fulfillment of Maratha's demands - Chandrakant Patil

कोमल औताडे (औरंगाबाद- प्रतिनिधी)- कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी द्या , मराठा समाजाला आरक्षण द्या , शेतमालाला भाव दया यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रात हजारो लाखोंच्या संख्येने 57 मुकमोर्चे निघाले तरी देखील मराठा समाजाला हाती काहीच न लागल्याने यासंबंधीचा जाब औरंगाबाद दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात येणार आहे.उद्या क्रांती चॊक या ठिकाणी सकल मराठा समाज एकत्रित होणार असून तेथे मुख्यमंत्र्यांनी समाधान कारक उत्तरं अथवा ठोस निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा निर्णय गुरुवारी पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत झाला .

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून राज्यभरात मोर्चे काढले गेले,औरंगाबाद मधून या मोर्च्यांना सुरवात झाली आणि दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथे 57 वा मराठा क्रांती मूक मोर्च्या निघाला . यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला मागण्या पूर्ण करण्याविषयी आश्वासने दिली होते परंतु अद्याप आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याने मराठा समाजा मध्ये खदखद आहे . औरंगाबादमधील क्रांती चौकात उद्या स्मारकीय ध्वजारोहण राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे . यावेळी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाने जमावे अशा प्रकारचे आवाहन काल सकल मराठा समाजाच्या झाालेल्या बैठकी मधून करण्यात आले आहे . मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास, खुली चर्चा न केल्यास अथवा ठराविक कालावधीत दिलेल्या आश्वासनांच्या अमलबजावणीची तारीख न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असेल असे देखील या बैठकी मध्ये सांगण्यात आले .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का