सोलापूरच्या पाणी प्रश्नात मुख्यमंत्री ठाकरे करणार मध्यस्थी; दिला ‘हा’ शब्द

uddhav thackeray

सोलापूर : मागील काही महिन्यांमध्ये सोलापूरचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला होता. उजनी धरणातील सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी इतर भागाला देण्यास सोलापूरकरांनी तीव्र विरोध केला होता. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी सोलापूरकरांनी स्थिती झाली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरकरांचा पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली आहे.

आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालच (दि. १९ जुलै) रोजी पंढरपुरात दाखल झाले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी दुहेरी पाईपलाईनसाठी अजून 103 कोटी रूपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंढरपुरात व्यक्त व्यक्त केली.

कोविड झालेल्या रूग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा. म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, औषधाचा पुरेसा साठा, इंजेक्शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवा , अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

IMP