मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून काल एका दिवसात मुंबईत रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार गेला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’आज मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर मंत्री तसंच शरद पवार यांच्याशी बोलून विकेंड लॉकडाउनसंदर्भात निश्चितच निर्णय होईल. एक मात्र स्पष्ट आहे की शनिवार रविवारी मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे राज्याला आणि मुंबईला जो धोका आहे, त्याची पातळी ओलांडताना दिसत आहे.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’जर आत्ताच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही, तर धोक्याची पातळी ओलांडून गेल्यावर धावपळ होणार. ती वेळीच रोखावी, अशा पद्धतीने मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चाललेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला पक्की खात्री आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे घिसाडघाईने निर्णय घेणारे मुख्यमंत्री नसून ते धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत’, असा विश्वासही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”