Share

CM Saur Krishi Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी योजना जाहीर, जाणून घ्या नक्की काय आहे?

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी (Farmer) उत्पादनात वाढ करत आहे. देशातील कृषी क्षेत्रात सध्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतीसाठी योजनांच्या माध्यमातून सहाय्य करत आहे. पारंपारिक शेती सोबतच शेतकरी आधुनिक शेती करत असल्याने सरकार त्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून सहकार्य करत असते. अशात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (CM Saur Krishi Yojana) जाहीर केली आहे आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. यासाठी लागणारी जमीन वार्षिक 75 हजार रूपये प्रति हेक्टर इतक्या भाडेपट्टीने घेण्यात येणार आहे. ज्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला जाईल त्या शेतकऱ्याला हेक्टरी वर्षाला 75 हजार रूपये मिळतील. महावितरण आणि इतर विज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. वर्षाला सरळ 3 टक्के भाडेवाढ देखील असणार आहे.

राज्य सरकारने निश्चित केलेल्य जमिनींचा समावेश निवीदा प्रक्रियेत करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्प करणारी कंपनी त्या जमिनीची निवड करेल आणि भाडे शेतकऱ्यांना देईल. प्रत्येक जिल्ह्यात एकुण विज वापराच्या 30 टक्के सौर ऊर्जा पद्धतीने करण्याचे उदिष्ट्य राज्य सरकारचे आहे.

या योजनेची प्रत्येक जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्याची समिती स्थापन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत …

पुढे वाचा

Agriculture

Join WhatsApp

Join Now