fbpx

गिरीश बापटांविरोधात कारवाईचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा : संजय काकडे

sanjay kakde

पुणे : वर्षभरात सरकार बदलेल अस वक्तव्य करून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. आता याच वक्तव्याला धरून बापट विरुध्द काकडे असा संघर्ष पुण्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

‘पुढच्या वर्षी सरकार बदलेल’, असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.’ अशी मागणी भाजप खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

2019 पर्यंत सरकारला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य यावेळी संजय काकडेंनी केलं आहे. ‘शिवसेना आणि आमचे इतके वाईट संबंध झालेले नाही की ते आमचा पाठिंबा काढून घेतील. तसंच 2019च्या लोकसभेत शिवसेनेनं आमच्यासोबत युती केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये. 2019ला राज्यात भाजपची एकहाती सत्ता येईल. आमच्या 170 ते 185 जागा येतील असा मला विश्वास आहे.’ असंही ते यावेळी म्हणाले.

गिरीश बापट काय म्हणाले होते?

वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या. पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या’, असं गिरीश बापट म्हणाले होते.

2 Comments

Click here to post a comment