माझा समाज अन्यायग्रस्त, या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावं : हर्षवर्धन पाटील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. कारण इंदापूरचे माजी आ. हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजप पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्यांवर भाजपमध्ये आलो आहोत. तसेच पक्षांतर करताना कोणतीही अट घातली नाही. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी पार पडण्यास मी कायम सक्षम असेल, असे पाटील म्हणाले. तर कार्यकर्त्यांना अद्याप वाटत नाही की मी भाजपामध्ये आलो आहे. कारण हा अन्यायग्रस्त समाज आहे पण या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावं. आणि माझ्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी विनंती यावेळी पाटील यांनी केली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही माढा शरद पवारांना पाडा बरोबरच सुप्रिया ताईना घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता, तसं झालं असत तर बारामतीमध्ये वेगळे चित्र पहायला मिळाले असते. हर्षवर्धन पाटील यांच्या येण्याने आणखीन भाजपची एक जागा वाढली आहे.