सिडको घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – विखे पाटील

नागपूर: सिडको घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सिडको भूखंड घोटाळयावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे.

नवी मुंबईतील सिडको येथील जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीचा अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचे कार्यालयाच गुंतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडकोची जमीन हि नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, सिडको जमिनींच वाटप हे नियमानुसारच करण्यात आल्याच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच यासर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सरकारकडून केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस