मुख्यमंत्र्यांनी शिक्षणात राजकारण आणू नये ! – सुप्रिया सुळे

devendra-supriya

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपा करून शिक्षणात राजकारण आणून नये, अशी विनंती खासदार सुप्रिया यांनी केली. शिक्षक भरतीसाठी पुण्यात सेन्ट्रल बिल्डींग जवळ सुरु असलेल्या उपोषण स्थळी सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्या पत्रकारांसोबत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा फार काही सुधारतोय असं नाही. राज्यातील उच्चशिक्षितांच्या काही मागण्या असतील तर त्यावर चर्चा करून मार्ग काढावा. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे.

दरम्यान , शरद पवार शेतकरी आंदोलन भडकवत असल्याची टीका होत असतांना. ‘पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय काही जणांनाच राजकारण होत नाही.’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकाकारांना सुनावले.