‘महिला आयोगाला अध्यक्ष का नेमत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे’

chandrkant patil vs uddhav thackrey

मुंबई : साकीनाका येथे घडलेल्या एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबईतील साकीनाका, ठाण्यातील उल्हासनगर, पुण्यात झालेल्या बलात्कारांच्या घटना या ताज्या असतानाच अमरावतीमध्ये एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आळेफाटा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत कारमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. उल्हासनगर मध्येही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. क्रूरतेचा कळस गाठत बलात्काऱ्यांची कृत्य काही थांबेना झालेत. तरी देखील महाराष्ट्राला अजूनही महिला आयोगाच्या अध्यक्ष मिळत नाहीयेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राच्या महिला आयोगाला अजून अध्यक्ष का मिळाला नाही याच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. महाराष्ट्रात एवढ्या महिलांवर अत्याचार घडत असतना महाविकास आघाडीचे नेते उत्तरप्रदेशमध्ये अशा घटना झाले असल्याचा दाखला देत आहेत. परंतु इथे झालेल्या घटनांचे त्यांना गांभीर्य नाही.’ असे स्पष्ट त्यांनी यावर मांडले आहे.

महत्वाच्या बातम्या :