भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याने केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवराज सिंह चौहान यांचे मेव्हणे संजय सिंह मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कॉंग्रेसमध्ये यादवी, राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

संजय सिंह मसानी हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह यांचे भाऊ आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि प्रचार समितीचे प्रमूख ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Rohan Deshmukh

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश

मध्य प्रदेशला आता शिवराज सिंह चौहान यांची गरज नसून कमल नाथ सारख्या नेत्याची आवश्यकता आहे. शिवराज सिंह चौहान यांची सत्तेतील तेरा वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आता दुसऱ्या कुणाला तरी संधी मिळाली पाहिजे असे संजय मसानी नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

२०१९ ला सोनिया किंव्हा प्रियांका गांधीही जिंकणार नाहीत; कॉंग्रेस नेत्याची भविष्यवाणी

Latur Advt
You might also like
Comments
Loading...