थकीत वीज बिलाबाबत मुख्यमंत्री म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई महापालिकेने लाखोंची नळपट्टी थकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला ‘वर्षा’ डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे. जवळपास ७ लाखांचे पाणी बिल थकवल्याने मुंबई मनपाने ही कारवाई केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी बिलं रेग्युलर भरली गेली होती. भरलेली बिलं पुन्हा आल्यामुळे बिलं थांबवण्यात आली. महानगरपालिकेला पत्र पाठवण्यात आलं त्यानंतर ती बिलं दुरुस्त होऊन आली त्यानंतर ती भरली गेली. या दरम्यानच्या कालावधीमध्ये आरटीआयच्या माध्यमातून बिले थकलेली आहेत, अशी माहिती समोर आली. त्यामुळे हे असं झालं अस मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोणाचीही पाणीपट्टी राहिली तर लगेच पाणी पुरवठा तोडला जातो. पाणी बीले भरली न गेल्यामुळे कमीपणा येतो. हे गंभीर आहे. यांचं पाणी कनेक्शन तोडा म्हणजे यांना पारोसे आल्यावर कळेल. असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.Loading…


Loading…

Loading...