काँग्रेस – जेडीएस आघाडीबाबत देवेगौडा यांचा मोठा खुलासा; वाचा नेमकं काय म्हणाले देवेगौडा   

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हत. मात्र भाजप १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांना बहुमतासाठी आणखी ८ जागांची आवश्यकता होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत राज्यपालांकडे सत्ता स्थापण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी कॉंग्रेस एवजी भाजपला सत्ता स्थापण्यासाठी बोलावल्याने कॉंग्रेसने या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपने सत्ता गमावली.दरम्यान दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देऊन, सत्ता स्थापनेचा दावा केला आज कॉंग्रेस जेडीएस युतीचे उमेदवार कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान त्या पूर्वी देवेगौडा यांनी कॉंग्रेस जेडीस युतीबाबत मोठा खुलासा केलाय. काँग्रेससमोर आम्ही मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, असं माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी म्हंटल आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत होत असलेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेगौडा यांनी वरील माहिती दिली. काँग्रेसने आपल्याशी संपर्क केला आणि आपण त्यांना संमती कळविली. या कठीण स्थितीत कुमारस्वामीच कारभार पाहू शकतात, असे काँग्रेसने म्हंटल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले.Loading…
Loading...