तीन राज्यातील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज, विरोधी पक्षांची एकजूट

टीम महाराष्ट्र देशा : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. मुख्यमंत्री पदासाठीचे अनेक दावेदार संपून मुख्यमंत्र्यांची नावांची घोषणा झाली. आज तीनही राज्यातील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राजस्थानात अशोक गहलोत हे मुख्यमंत्री, तर उपमुख्यमंत्रिपदी सचिन पायलट, मध्य प्रदेश मध्ये कमलनाथ तर  छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल हे आज शपथ घेणार आहेत.

आजच्या या शपथविधी सोहळ्यातून कॉंग्रेस शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या हातातून खेचून घेतलेल्या या राज्यातील शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस तर्फे भाजपविरोधी पक्षांना आमंत्रण देण्यात आली आहेत. एकंदरीत आज भाजप विरोधी पक्षांची एकजूट दिसणार आहे.