जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री ‘मेहबुबा’ पाकिस्तानच्या- सुब्रमण्यम स्वामी

mahebuba mufati vr swami

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री मुफ्ती यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मेहबुबा या पाकिस्तानच्या मेहबुबा आहेत, आमच्या नाहीत, असे खळबळजनक विधान स्वामी यांनी केले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी कश्मीर खोऱ्यात शांतता राहावी यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा व्हायला हवी, शेजारी देशाशी सलोखा राखला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधानांनी पाकिस्तानसोबत चर्चा करायला हवी. अशी मागणी केली होती. यावर टीका करत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, आपण आजही पाकिस्तानच्या बाबतीत फारच सौम्य भूमिका ठेवली आहे. मेहबुबा मुफ्तींसारख्या काही लोकांमुळेच आजही पाकिस्तान हा आपल्या मोस्ट फेव्हर्ड देशांच्या यादीत आहे. पण या मेहबुबा पाकिस्तानच्या मेहबुबा आहेत, आमच्या नाहीत. अशी टीका स्वामी यांनी केली आहे.