लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप

Pravin Darekar

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची कौल्हापूर दौऱ्यात झालेली भेट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी जरी जास्त उल्लेख केला नसला तरी त्यावर तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यात पूरग्रस्त भागातील नागरिकांचा सरकारवर रोष आहे. हा रोष कमी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

या संदर्भात माहिती देताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचा भेटण्यासाठी निरोप आला होता. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो. पूरग्रस्त भागाचा संक्षिप्त अहवाला एवढ्या कमी वेळात सांगणे शक्य नव्हते. त्यामुळे मुंबईला गेल्यावर या संदर्भात बैठक बोलावण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच नुकसानग्रस्त भागाला तत्काळ मदत करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या भेटी दरम्यान लोकांनीच २०१९ मध्ये तत्काळ मदत मिळाली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारवर लोकांचा जास्त रोष आहे. तो रोष कमी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या