मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल

टीम महाराष्ट्र देशा : लो ब्लड प्रेशर आणि डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना  हलवण्यात आले. बुधवारीच पर्रीकर अमेरिकेतून उपचार घेऊन गोव्यात आले होते. मुंबईत त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा आणि डॉ. कोलवाळकर देखील आले आहेत.

लो ब्लड प्रेशर आणि डीहायड्रेशन या आजारावर अमेरिकेतील स्लोन केटरिंन या हॉस्पिटल मध्ये सलग अकरा दिवस उपचार सुरु होते. त्यानंतर ते २२ तारखेला गोव्यात आले. आज पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात ते आपला  सहभागी नोंदवणार होते. मात्र अचानक उपचारासाठी मुंबईत जावे लागल्याने इतर नेत्यांच्या हस्ते अटलजींच्या अस्थींचे विसर्जन होईल.

bagdure

आयएएस अधिकाऱ्याच्या पणतूलाही मागासवर्गीय समजणार का?, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

You might also like
Comments
Loading...