दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मुख्यमंत्री ममतांचा पाठिंबा

कोलकाता : वादग्रस्त तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पाठिंबा जाहीर केला आहे. तत्पूर्वी शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिके त व युद्धवीर सिंह यांनी ममतांची राजधानी कोलकात्यात भेट घेतली आहे.

‘किमान हमीभाव’ (एमएसपी) आणि कृषी कायदे मागे घेण्यास ममतांनी पाठिंबा द्यावा, असा आग्रह शेतकरी नेत्यांनी केला. त्यास ममतांनी क्षणाचाही विलंब न लावता पाठिंबा दिला. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) सरचिटणीस युद्धवीर सिंह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याबद्दल आम्ही ममतांचे अभिनंदन केले.

आता एमएसपीची व्यवस्था कायम राहण्यासाठी त्यांचा पाठिंबा आम्हाला हवा आहे. आम्ही तसा आग्रह केला असता ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. बंगालमध्ये फळे, पालेभाज्या तथा दुधासाठी एमएसपी जाहीर करण्याची मागणी आम्ही ममतांकडे केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी मोदी सरकार तयार

कृषी कायद्यांच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत नव्याने चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांवरील आक्षेप सरकारपुढे मांडावेत. त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही

सरकारने शेतकऱ्यांशी ११ टप्प्यांत चर्चा केली. कायद्यांवर तुमचे आक्षेप काय आहेत, अशी विचारणा शेतकरी संघटनांना केली, पण कोणत्याही शेतकरी नेत्याने त्यावर उत्तर दिले नाही. संसदेत राजकीय पक्षही त्यावर उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही.’ असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

IMP