मुख्यमंत्रीसाहेब, माझ्यासाठी पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या; वाशिमच्या युवकाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

udhhv thakre

वाशिम : मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. वाशिमच्या गजानन राठोड या युवकाने राज्याचे मुख्यमंत्री यांनाच थेटपत्र लिहिलेले. या युवकाचे हे पत्र आता चर्चेचा विषय ठरला आहे.

पत्रात युवकाने लिहिले, “माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी नोकरी असावी ही अट असते. पण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे नोकरी मिळणे कठीण झाले आहे” अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रात व्यक्त केली आहे.

आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत.

दरम्यान, राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले होते राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे होते.

महत्वाच्या बातम्या