मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात- विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या कामात ढवळाढवळ असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. महापालिकेच्या कामात हस्तक्षेप करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा नेमका हेतू काय आहे ? असा प्रश्न देखील महाडेश्वर यांनी उपस्थित केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, आतापर्यंत ९० टक्के नाल्यांची साफसफाई झाली आहे. पावसाळ्यात समुद्राला भरती आली आणि ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर मुंबई तुंबणार आहे. बचावासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. अतिवृष्टीसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून, मुंबईकरांना त्रास न होण्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.