fbpx

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आज पार  पडला. यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिल्प व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूणार्कृती शिल्प बनवण्यात आले आहे. आज या शिल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांगाना उपकरण वाटप, आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात निधी वाटप करण्यात आला. तसेच नगरपरिषदेच्या  शाळातील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅब वाटप आणि कृषी विभागामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत संभाजी भोसले यांना ट्रॅक्टरची प्रतिकात्मक चावी सुपूर्द करण्यात आली.

या कार्यक्रमा प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, आदी मंडळी उपस्थित होते.