भाजप मध्ये पक्षांतर्गत वाद विकोपाला

cm fadnvis

मुंबई : सोलापूर महापालिकेत भाजप पक्षाची एक हाती सत्ता असतांना पक्षांतर्गत गटबाजीमुळे महापालिकेत चांगलीच राजकीय दंगल रंगली आहे. या दंगलीत दोन गट निर्माण झाले आहेत. एक सहकार मंत्री गट आणि दुसरा पालकमंत्री गट यांच्या वादामुळे पक्षात गटबाजी दिसून येते. या पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे भाजपची नाहक बदनामी होत असून याचे टेन्शन आता मुख्यमंत्र्यांना आले. यापुढे गटतट विसरुन एकदिलाने कारभार करा, अन्यथा तीन महिन्यांत मनपा बरखास्त करु असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मनपाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना ठणकावल.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन गटांच्या वादामुळे भाजप मध्ये गढूळ राजकारण होत आहे. अनेक सभा व चर्चेत हे गट एकमेकांच्या विरोधात उभे असतात. त्यामुळे एकाच पक्षाचे असून सुद्धा गटबाजी असल्यामुळे भाजपची अब्रु अनेकवेळा घालवली. यामुळे भाजपची मोठी बदनामी होऊन जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी गाळेभाडे वाढ विषयासंदर्भात दोन गटांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही गटांना सुनावले होते. मनपा सभागृह नेते सुरेश पाटील हे आजारी पडल्यापासून हे पद कोणी घ्यावे म्हणून दोन गटात वाद निर्माण झाला होता. पालकमंत्री गटाने सहकारमंत्री गटावर मनपा सभेत वरचढ केली. त्यामुळे सहकारमंत्री गटाने शिवसेना एमआयएमची मदत घेऊन मोठ्या खुबीनी ही खेळी उधळून लावली होती. या घटनेमुळे भाजप ची लत्तरे वेशीला टांगण्यात आल्यावर मुख्यंमत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आणि सर्व नेत्यांना मुंबई बोलावून ठणकावले.