Supriya  sule- ‘गृहमंत्री’ या नावाला सीएम फेल: सुप्रिया सुळे

पुणे – कोपर्डीतील घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. तरीदेखील या प्रकरणत अध्याप न्याय मिळाला नाही. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते काऊंसिल हॉल असा मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात खासदार सुप्रिया सुळेंसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
       एक वर्षांनतरही हे सरकार आरोपीना शिक्षा देण्यास अपयशी ठरले आहे. सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण मार्गी लावू असे आश्वासन दिले होते पण सरकार आपले आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून हे रोखण्यास ठरले आहे अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.