पानसरे-दाभोळकर हत्या प्रकरण : सरकारला घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार – उमा पानसरे

टीम महाराष्ट्र देशा- कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासात भाजप सरकार खुन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत उमा पानसरे यांनी निष्क्रिय भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सरकारला घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केलं. भाकपच्या वतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी कोल्हापुरात त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या उमा पानसरे ?

‘भाजप सरकार एकप्रकारे खुन्यांना पाठीशी घालत आहे. सरकारला बुद्धिवादी विचारवंतांची आवश्यकता नसून त्यांना साधुसंत, योगी आणि भ्रष्टाचारी लोकांची आवश्यकता आहे. यामुळेच खुन्यांचा तपास लागत नाही. याला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.’

‘बुद्धिवादी विचारवंतांचे बळी गेले, तरी त्यांचे विचार संपत नसतात. पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निष्ठुरवादी सरकारला हद्दपार करून रस्त्यावरील लढाई सुरू ठेवावी लागणार आहे. या लढाईत यश निश्चित येणार असून, सरकारला घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार’ .

You might also like
Comments
Loading...