नाले सफाईचे धोरण जाहीर करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबई महापालिकेला आदेश

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाला सुरवात होताच हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

मुंबई तुंबण्याचे प्राथमिक कारण हे अरुंद नाले असल्याच समोर आल आहे. तर विधानसभेत विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांना मुंबईच्या प्रश्नावरून धारेवर धरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाले सफाईबाबत मुंबई महापालिकेने धोरण जाहीर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जुलैपर्यंत नालेसफाई झाली पाहिजे. यासंदर्भातील धोरण महापालिकेने तयार करुन ते घोषित करावे, त्यानंतर याबाबत निश्चितपणे कारवाई केली जाईल. तसेच मुंबईत काल रात्री झालेला पाऊस हा १९७४ मध्ये झालेल्या पावसानंतर सर्वात मोठा पाऊस होता. अशा प्रकारे कमी वेळात मुंबईत अभुतपूर्व पाऊस झाल्याने मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागला.

दरम्यान मुंबईत गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाउस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांची दाणादाण झाली आहे. सर्वत्र पाणी साचले असून वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन नेमक करतय तरी काय ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. तर हाच प्रश्न विरोधकांनी देखील विधान सभेच्या अधिवेशनात उचलून धरला आहे.