मुख्यमंत्री फडणवीस दक्षिण कोरिया, सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दक्षिण कोरिया, सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महाराष्ट्राचे शिष्टमंडळ विविध उद्योगसमुहांशी चर्चा करणार आहे. विविध महत्त्वाच्या प्रकल्पांनाही मुख्यमंत्री भेट देणार आहेत.

राज्यातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांतील गुंतवणुकीबाबत या दौऱ्यात चर्चा होणार आहे.मुख्यमंत्र्यांसह अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी हेदेखील दौ-यावर असणार आहेत.

You might also like
Comments
Loading...