देवेंद्र फडणवीस खडसेंना घाबरतात म्हणून दिली त्यांना क्लीनचीट- अंजली दमानिया

भ्रष्टाचाराविरोधात उभी राहिल्याने खडसेंकडून मानसिक छळ

जळगाव : भोसरी प्रकरणी खडसेंना क्लीनचीट घाईघाईत देण्यात आली. भाजपाची विकेट जाण्याच्या मार्गावर असल्याने मते जाऊ नयेत, खडसे पक्षाबाहेर जाऊ नये म्हणून की मुख्यमंत्री फडणवीस त्यांना घाबरतात म्हणून क्लीनचीट दिली? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. दमानिया जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

दमानिया म्हणाल्या, भ्रष्टाचाराविरोधात उभी राहिल्याने खडसेंकडून मानसिक छळ करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यासाठी आतापर्यंत जळगाव, बुलढाणा, नंदुरबार, जालना नाशिक या ठिकाणी २६ बदनामीचे दावे दाखल केले आहेत. गुन्हेगारी विश्वातून दोन धमक्याही मिळाल्या आहेत. त्यात एक धमकी रवि पुजारी टोळीकडून मिळाली आहे.

अखेर एकनाथ खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल

अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दामानिंयाना अश्लील फोन

You might also like
Comments
Loading...