fbpx

मुख्यमंत्री फडणवीसांनी मतपेटीत नोंदवले मत, बहुसंख्येने मतदान करा असे केले आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीच्या कुंभमेळ्याला आज सुरुवात झाली आहे, लोकसभेसाठी पहिल्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे. विदर्भातील ७ जागांसह देशभरातील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे. मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि आईंसह मतदानाचा हक्क बजावला. नागपुरातील धरमपेठ मतदान केंद्रावर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदान केले.

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात मजबुत सरकार यावं यासाठी मी आणि माझ कुटुंब मतदान करत आहोत. तसेच, यावेळी नागिरकांना देखील जास्तीत-जास्त संख्येने मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. आज देशभरातील ९१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर नागपुरात दुपारपर्यंत ३८ टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान नागपूर लोकसभा मतदार संघात एकेकाळचे दोन सहकारी आमने सामने आले आहेत त्यामुळे या लढतीमध्ये वेगळीच रंगत पहिला मिळणार आहे. युतीकडून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी रिंगणात आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी आघाडीने नाना पटोले यांना रिंगणात उतरवल आहे. त्यामुळे कधीकाळी एकाच पक्षात कार्य करणारे नेते आज एकमेकांविरोधात लढणार आहेत.