Share

CM Eknath Shinde | नाशिक येथील भीषण अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

नाशिक : नाशिक (Nashik) येथील मिरची चौकात धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यामध्ये १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ३४ जणांवर उपचार सुरु आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापुर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया –

नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट –

नाशिक येथे भीषण अपघात –

बस आणि टँकरचा अपघात झाल्यानंतर, बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये १० प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.

नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया –

दरम्यान, नाशिक येथे टॅंकर आणि खाजगी बस यांचा भीषण अपघात झाल्याची घटना अतिशय वेदनादायी व दुःखद आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना विनम्र श्रद्धांजली. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. ॐ शांती, असं म्हणत नितीन गडकरी यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी, नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद असल्याचं म्हटलं आहे. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

नाशिक : नाशिक (Nashik) येथील मिरची चौकात धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nashik Politics