मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळानंतर आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. जवळपास १० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबतची ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे.
यानंतर आजचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोबत आहेत. त्यांच्या साथीने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर ठाण्यात शिंदे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष देखील पहायला मिळाला.
यानंतर शिंदे सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि परिस्थितीची माहिती घेतली. प्रलंबित प्रश्न, योजनांना पुढे घेऊन जाऊ असे शिंदे यांनी सांगितले आहेत. तसेच जाता जाता मुख्यमंत्री म्हणाले कि, माजी मुख्यमंत्रीही सोबत आहेत, त्यामुळे जोरदार बॅटिंग करु.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<