सोलापूर : गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. तसेच यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात झालेल्या लोकांच्या नातेवाईकांशी संवाद साधला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला आहे. तसेच सर्व मदत यंत्रणा उपलब्द करून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ravi Rana : “शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, अन् शिवसेना भवनही… ”, रवी राणा यांचं मोठं भाकीत
- Urfi Javed | उर्फी जावेदने घातला गुलाबाच्या पाकळ्यांचा ड्रेस; चाहते झाले घायाळ | पहा VIDEO
- Ravi Rana : “संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी, उद्धव ठाकरेंचं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील”, रवी राणांचा हल्लाबोल
- Anand Dave : पवार साहेब यांनी आत्ता शिवचरित्र लिहावं आणि महाराजांना न्याय द्यावा – आनंद दवे
- Sharad ponkshe | दिल्लीतल्या ५० वर्षाच्या घोड्याला गोळवलकर बोलता येईना- शरद पोंक्षे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<