Share

Eknath Shinde | “तुम्ही रात्री, अपरात्री…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Eknath Shinde | मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या १० वर्षांपासून चालत आलेला दिपोत्सव शिवतीर्थवर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

सर्वांनाच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यानंतर, या शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दिपोत्सव मागील 10 वर्षांपासून आयोजित केला जातो, मागील 2 वर्ष कोरोनामुळे आपल्याला अनेक सण इच्छा असूनही मर्यादेमुळे साजरा करता आले नाही. सर्वांना सोबत घेऊन राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी करताय, मी त्यांचं अभिनंदन करतो, असं देखील शिंदे म्हणाले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व ममान्यांवरांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला –

यादरम्यान, यावर्षी आम्ही सर्व उत्सव जोरात करायचे ठरवले. तसेच ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करतोय. गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये लोकांनी खूप आनंद घेतला. सर्वजण दबून बसले होते. मात्र, आता थोडा मोकळा श्वास घेतला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असं म्हणत तुम्ही कधीही आम्हाला सांगता ते लोकांच्या, हिताचे विषय सांगता. शेतकऱ्यांसाठी देखील आपण मदत झाली पाहिजे, मदत झाली पाहिजे, हेदेखील तुम्ही आम्हाला सांगितलंय. आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत असतो, त्यामुळे राजसाहेब तुम्ही कधीही अगदी रात्री, मध्यरात्री अपरात्रीही आम्हाला भेटायला येऊ शकतात. आम्ही बिलकूल भेटणार, असे नाव घेता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबत ज्या काही भावना आहेत, हे सरकार नक्कीच त्याचा आदर करेल, शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना जेवढं काही देता येईल, तेवढं त्यांना देऊ, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, हा दिपोत्सव आपल्या सर्वांचं जीवन प्रकाशमय करो, ज्याप्रमाणे आपण याठिकाणी रोषणाई केली, तशीच सर्वांच्या मनामध्ये अगदी ही रोषणाई उजळून निघू द्या, सर्वांना सुखाचे समृद्धीचे दिवस येवो, यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहील, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी या दिपोत्सवमध्ये केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या १० वर्षांपासून चालत आलेला दिपोत्सव शिवतीर्थवर आयोजित …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now