Share

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान होत आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधाऱ्यांनी यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान आज 363 वा शिवप्रताप दिन (Shiv Pratap Day) आहे. त्यानिमित्त प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा हक्क नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले,  “छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष नेहमी होतो. शिवप्रताप दिनाचे महत्व समजून घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती. तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्व अधिक वाढले असते. महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवणात आहेत. मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. शिवरायांचा अपमान करुन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील त्यांच्या जाग्यावर बसले आहेत. हे लोक त्यांचे समर्थन करतात. अशा मुख्यमंत्र्यांनी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गडावर जाऊन अभिवादन करण्याचा अधिकार नाही.”

उदयनराजेंच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले,” उदयनराजे यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. शिवरायांचा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का येत नाही ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली. पण मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार अशा प्रकारचा होत असलेला अपमान हतबलतेने पाहते आणि त्यानंतर शिवप्रताप दिन साजरा करते हे सर्व ढोंग आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

Sanjay Raut | मुंबई : राज्यात भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान होत आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now