मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचले; कर्डिलेंची हकालपट्टी नाही

देवेंद्र फडणवीस

मुंबई: राजकीय वैमनस्यातून शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची शनिवारी सुवर्णनगर परिसरात गोळीबार करुन हत्या करण्यात आली. दरम्यान, हत्या प्रकरणात हात असलेल्या आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी करावी.’ अशी मागणी शिवसेनेनं केली. मात्र भाजपने शिवसेनेला डिवचले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याचे वृत्त आहे. एकीकडे शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले म्हणून श्रीपाद छिंदमची भाजपने हकालपट्टी केली होती. तर दुसरीकडे हत्या प्रकरणातील आरोपींची मुख्यमंत्री पाठराखण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम म्हणाले, ‘भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. पण त्यांच्या हकालपट्टीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळलं. मात्र, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.’ राजकीय स्वार्थासाठी भाजपा गुन्हेगारांची पाठराखण करत आहे का ? अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काय आहे प्रकरण ?

शनिवारी ७ एप्रिल रोजी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक ३२ मध्ये पोटनिवडणुकीत पार पडली, मात्र याचवेळी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप त्यांचे वडील आमदार अरुण जगताप, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा संदीप कोतकरसह ५० जणांवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment