मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर या विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही माहिती खोटी असून मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढणार असल्याचे भाजपच्या मंत्र्यांने सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंडमधून निवडणूक लढवणार अशी अफवा होती. त्यातील मलबार हिलचा पर्याय आघाडीवर होता. हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या जागेवरून उतरवण्यात येईल अशी चर्चा होती.

मात्र, असे काहीही नसून मुख्यमंत्री फडणवीस केवळ नागपूर मधून लढणार असल्याच सांगितल जात आहे. मुंबई मिरर या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मुख्यमंत्री फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहेत.