‘सुन रहा है ना तू’ … रो रहा हू मै ; मुख्यमंत्र्यांनी लावला सूर

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘मुंबई रिव्हर अॅंथम’ गाण्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनयाला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केल होत. तर विरोधकांनी सुद्धा या गाण्यावर सडकून टीका केली होती. एवढ झाल्यावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गाण्याचा मोह टाळता आला नाही. दैनिक लोकमत वृत्तपत्रातर्फे आयोजित ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ समारंभात गायक अंकित तिवारीच्या आग्रहानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “सुन रहा है ना तू…रो रहा हू मै” हे गाणं गायलं आहे.

( व्हिडीओ – ABP माझा ) 

नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलात काल रात्री हा कार्यक्रम पार पडला. गायक अंकित तिवारी यांनी हिंदी चित्रपटातील अनेक गाणी सादर केली.त्यादरम्यान अंकितने ‘सुन रहा है ना तू’ या गाण्यावर मुख्यमंत्र्यांनाही गाण्याचा आग्रह केला.त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत एक ओळ म्हणत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.