मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय दहशतवादी : कॉंग्रेस

औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय दहशतवादी आहेत अशी टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी औरंगाबाद येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे. भीमा कोरेगाव दंगलीबद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना वाघमारे यांनी भाजपवर सडकून टीका केली. या बंद मध्ये सहभागी सर्वच तरुण सर्वच हिंसक कृत्य करत नव्हते पण सरकार ने सुडापोटी 8 हजार तरुणांवर हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करून कोंबिग ऑपरेशन सुरू केलं. गरीब तरुणाना अटक करून त्यांचं आयुष्य बरबाद करण्याचं काम सरकार करत असल्याची घणाघाती टीका वाघमारे यांनी केली आहे.

डॉ. राजू वाघमारे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • कोरेगाव भीमा दंगलीनंतर पहिल्यांदा काँग्रेस ने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आशी मागणी केली काँग्रेस या लढ्यात दलितांच्या खांद्याला खांदा लावून लढले आहे लढणार आहे.
  • या बंद मध्ये सहभागी सर्वच तरुण सर्वच हिंसक कृत्य करत नव्हते,पण सरकार ने सुडापोटी 8 हजार तरुणांवर हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करून कोंबिग ऑपरेशन सुरू केलं गरीब तरुणाना अटक करून त्यांचं आयुष्य बरबाद करण्याचं काम सरकार करत आहे.
  • संभाजी भिडे हा माणूस मोदींच्या इतका जवळचा आहे की ,पंतप्रधान मोदी बोलले की ते भिडेंचा आदेश पाळतात म्हणून तर महाराष्ट्र सरकार त्यांना अटक करत नाही.
  • मुख्यमंत्री जसे कोणालाही देशद्रोही म्हणतात तसे आम्ही म्हणतो की ते राजकिय दहशतवादी आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना राजकीय दहशतवादी असे घोषित करतो
  •  संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या सुरक्षेबद्दल बोलताना वाघमारे म्हणाले की हे सरकार आल्यापासून मला अनेकदा जिवे मारण्याच्या, हातपाय तोडण्याच्या धमक्या आल्या मी वारंवार अर्ज करतो की मला सुरक्षा द्या तर मला देत नाही आणि भिडेला आणि मिलिंद एकबोटेला तुम्ही सुरक्षा देता असा आरोप ही त्यांनी यावेळी केला
You might also like
Comments
Loading...