सुवर्णपदक विजेत्याला महाराष्ट्र शासनाकडून 50 लाख रुपये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्य शासनाकडून रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. यात पदकाच्या स्वरूपानुसार रोख रक्कमही देण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या आणि पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली असलेल्या राही सरनोबतचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये, रजत पदक विजेत्यांना प्रत्येकी 30 लाख आणि कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये 25 मीटर क्रीडा प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने केली.

मुरली मनोहर जोशी -उद्धव ठाकरे भेट, दोन्ही नेत्यांमध्ये झाली तासभर चर्चा

 

You might also like
Comments
Loading...