उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

टीम महाराष्ट्र देशा – सातारा येथील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्या गुफ्तगू चालू आहे. त्यातच आज झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

साताऱ्यामध्ये काही दिवसापूर्वी उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौत केले होते.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि बिंदास्त वक्तव्यावरून कायम चर्चेत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार असूनही विरोधी पक्षाच्या नेत्यांची जाहीर सभेत कौतुक करूनही पक्ष त्यांच्यावर कसलीही कारवाई करत नाही.आता पुन्हा खासदार उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीरसभेत तोंड भरून कौतुक केले आहे.त्यासोबत त्यांनी महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका. असं उदयनराजेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहात सूचक वक्तव्य केले होते.