मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कार्यक्षम आणि दूरदृष्टीचे नेते

बुलडाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कार्यक्षम आणि दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या काळात लाभलेल्या जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्राला खूप मोठा लाभ झाला आहे. शिवाय गुजरात, महाराष्ट्र पाणी प्रश्नाच्या बाबतीतही त्यांनी आग्रही भुमिका घेवून आपल्या मागण्या मान्य करून घेत एका मुत्सद्दी नेतृत्वाचा परिचय दिला आहे. अशा शब्दात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.

भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत सुजलाम् सुफलाम् बुलडाणाचा उदघाटन सोहळ्यात मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मत्री नितिन गडकरी यांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत गडकरींनी २० हजार कोटींपैकी एकट्या बुलडाणा जिल्ह्याला जीगावच्या रुपाने पाच हजार कोटींची भेट दिली. तर पाच हजार कोटींचे रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडून बुलडाणा जिल्ह्यांच्या समृध्दीच्या वाटा खुल्या करून दिल्या आहेत .

भारतीय जैन संघटनेच्या वतीने सुजलाम् सुफलाम् बुलडाणा या महत्वकांक्षी प्रकल्पाचे औपचारीक उदघाटन आज (दि ३) सकाळी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री पांडूरंग फुंडकर,खासदार प्रतापराव, राज्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री पांडूरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...