फडणवीसांचा भक्तीरंग: महाजनादेश यात्रेवेळी वारकऱ्यांसोबत धरला ताल

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. यानिमिताने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा भुसावळमध्ये दाखल झाली. या यात्रे दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनीही ताल धरला. ताळ-चिपळ्या गळ्यात घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालत होते. त्यांच्यासोबत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनदेखील होते.

तसेच लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पार्टीने आता विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले आहेत. विधानसभेत बहुमताने निवडून येण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. राज्य सरकारने पाच वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचत पुन्हा पाच वर्ष संधी मिळावी यासाठी भाजपतर्फे ही यात्रा काढण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात आता काही दिवसातचं विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देखील जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘महाजनादेश यात्रे’वर जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या