शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या भाजप नेते यशवंत सिन्हांशी चर्चेस मुख्यमंत्र्याचा नकार

\अकोला: विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले बंडखोर भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यशवंत सिन्हा यांच्यासह जवळपास २५० शेतकऱ्यांना काल अकोला येथून अटक करण्यात आली. मुख्यमंत्री सिन्हा यांच्याशी बोलणार नाहीत, तर त्यांचे पीए बोलतील असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याच भाजप खासदार नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

दरम्यान मंगळवार संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजपचे जेष्ठ नेते अरुण शौरी, खासदार शत्रुघ्न सिन्हा. खासदार वरुण गांधी हे देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे.

IMP