मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आरएसएसची नक्षलवाद्यांशी तुलना; म्हणाले…

bhupesh baghel

छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना नक्षलवाद्यांशी केली आहे. ते म्हणाले की,’ज्याप्रमाणे राज्यातील नक्षलवादी इतर राज्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कामे करतात त्याचप्रमाणे स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नागपुरातून चालवले जातात.

मागील आठवड्यातील कवर्धा हिंसाचाराविषयी भाष्य करतांना बघेल म्हणाले की, ‘कवर्धा हिंसाचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १५ वर्षांच्या राजवटीत, आरएसएसच्या लोकांनी काहीच केले नाही आणि ते अजूनही बंधनग्रस्त मजुराप्रमाणे काम करत आहेत. आजही त्यांचे (आरएसएस कार्यकर्ते) ऐकले जात नाहीत आणि ते नागपुरातून नियंत्रित केले जातात.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जसे नक्षलवाद्यांचे नेते आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांत आहेत आणि येथील लोक फक्त गोळीबार आणि गोळ्या खाण्याचे काम करतात, अशीच परिस्थिती संघाची आहे. तसेच जे काही आहे ते नागपूरचे आहे. येथे आरएसएस लोक बंधुआ मजुरांसारखे काम करत आहेत. यांचे काहीही चालत नाही, त्या सर्वांना नागपुरातून नियंत्रित केले जाते’ असेही बघेल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या