मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना शेतकऱ्यांच्या हिताची : महादेव जानकर

मुंबई : राज्याच्या दुर्गम, डोंगराळ आणि आदिवाशी भागातील शेतकऱ्यांच्या पशूंसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पशूंवर दारात जाऊन उपचार केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.

मंत्री महादेव जानकर म्हणाले की, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे पशु आजारी पडल्यास वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे पशु मृत पावण्याची शक्यता असते. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने राज्य सरकारने मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला ही योजना राज्यातील दुर्गम 80 तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यापोटी राज्य सरकारने 16 कोटी 74 लाख रुपये एवढ्या खर्चास मान्यता दिली आहे.

Loading...

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 80 फिरती पशुचिकित्सा पथके तयार करण्यात येणार आहेत. यासाठी उपकरणांनी सुसज्ज अशी वाहने तयार करण्यात येणार आहेत. या फिरत्या पथकात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी , चालक आणि इतर मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. अशी सुसज्ज पशुचिकित्सा पथके 80 तालुक्यात उपचारासाठी लवकरच पाठविली जाणार आहेत.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत वंध्यत्व, सुकलेला गर्भ, मंद प्रसूती, संसर्गजन्य विकार, प्रोटोझोन विकार, अन्न विषबाधा, अतिसार, पोट फुगणे, सर्पदंश, दुखापत, गळू, जखम, अस्थिभंग, डोळ्यांचा कर्करोग आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

तर, मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरती पथके, पशूंचे औषधोपचार, कर्मचारी आदींवर 16 कोटी 74 लाख रुपये खर्च येणार असून राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत