मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे यांची पुण्यात होणार संयुक्त बैठक

पुणे : भाजप-शिवसेनेच्या संयुक्त बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी पुण्यात येणार आहेत. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली कटूता दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होनर असून, पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदार संघांतील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी कार्यकर्त्यांचे मने मात्र जुळले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. आणि याचा तोटा युतीला होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यात भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील अशी आशा पक्ष हायकमांडला वाटत आहे.