मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडालीये. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या वडाळामधल्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच गावातल्या २ व्यक्तींना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद श्रीरामे असं आरोपीचं नावं आहे.तो चिमूर तालुक्यातल्या वडाळा गावचा रहिवासी आहे.दरम्यान यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

गोसेखुर्दला निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस